जिओ-बीपी द्वारे E२० मिश्रित पेट्रोलची विक्री सुरू

नवी दिल्ली : Jio-bp ने बुधवारी E२० मिश्रित पेट्रोल (इथेनॉलमध्ये २० टक्के मिश्रण आणि जीवाश्म-आधारित ईंधनाच्या ८० टक्के) रोल-आउटची घोषणा केली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारद्वारे निर्धारित रोडमॅपच्या अनुरुप Jio-bp भारतामध्ये E२० मिश्रित पेट्रोल उपलब्ध करुन देणारा हे पहिले घाऊक इंधन विक्रेते बनले आहेत. ई २० पेट्रोलसह वाहनांचे ग्राहक निवडक Jio-bp आउटलेटवर या इंधनाचा पर्याय निवडू शकतील आणि लवकरच पूर्ण नेटवर्कमध्ये ई २० मिश्रीत पेट्रोल उपलब्ध होईल. रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (आरबीएमएल) रिलायन्स इंडस्ट्रिज आणि बीपीदरम्यानचा ‘जियो-बीपी’ एक संयुक्त उपक्रम आहे.

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैव इंधनचा वापर वाढविण्याच्या कार्यक्रमांतर्गत ११ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांतील निवडक पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोलची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचा उद्देश ऊत्सर्जन कमी करणे परदेशावरील आपले अवलंबित्व घटविण्याचा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते आणि २०२५ पर्यंत इथेनॉलचे मिश्रण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मोदी यांनी २० टक्के इथेनॉल मिश्रण लाँचिंगनंतर सांगितले की, २०१४ नंतर पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण १.५ टक्क्यांवरुन वाढवून १० टक्के करण्यात आले आहे. आणि आता हे प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. या योजनेअंतर्गत सर्वात आधी देशातील १५ शहरांचा समावेश करण्यात आला आहे. आणि पुढील दोन वर्षांमध्ये देशभरात याचा २० टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल पंपांवर विस्तार करण्यात येईल. इंधन आयात १० टक्के घटविल्याने देशात ५४,८९४ कोटी रुपयांची बचत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here