सोमवारी दिलासा, पेट्रोल-डिझेल दरवाढीला लागला ब्रेक

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सोमवारी दिलासा मिळाला. सलग पाच दिवसांच्या वाढीनंतर आज, पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात काहीच बदल केले नाहीत. दिल्लीत पेट्रोल १०७.५९ रुपये तर डिझेल ९६.३२ रुपये प्रती लिटरवर पोहोचले आहे.

तर मुंबईत पेट्रोल ११३.४६ रुपये आणि डिझेल १०४.३८ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल १२० रुपये प्रती लिटर झाले आहे. मुंबई, पाटणा, बेंगळुरू, हैदराबादसारख्या शहरात पेट्रोल ११० रुपयांवर आहे. बिहारची राजधानी पाटणासह मुजफ्फरनगर, पुर्णिया, गया आणि भागलपूरमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. पाटण्यात पेट्रोल १११.२४ रुपये आणि डिझेल १०२.९३ रुपये प्रती लिटर आहे.

गेल्या १८ महिन्यात पेट्रोल ३६ रुपये आणि डिझेल २६.५८ रुपयांनी महागले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांत इंधन दराने शतक गाठले आहे. मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात पेट्रोल ११९ रुपये प्रती लिटर आणि डिझेल १०८ रुपये प्रती लिटर आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये ११८ रुपये पेट्रोल आणि १०७ रुपये डिझेल अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here