पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ, दिलाशाची शक्यता नाही

नवी दिल्ली : देशातील नागरिकांना कोरोनानंतर आता महागाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमती गेल्या तीन वर्षात पहिल्यांदा ८० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी पेट्रोलच्या दरात २० पैसे तर डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ करण्यात आली. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत १०१.१९ रुपयांवरुन वाढून १०१.३९ रुपये प्रती लिटर झाली आहे. तर मुंबईत १०७.४७ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल मिळत आहे. दुसरीकडे डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. दिल्लीत ८९.५७ रुपये आणि मुंबईत ९७.२१ रुपये प्रती लिटर दराने डिझेल मिळत आहे.

गेल्या पाच महिन्यात डिझेलच्या दरात चौथ्यांदा दरवाढ झाली. तर जवळपास अडीच महिन्यानंतर, मंगळवारी पेट्रोलही महागले. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारांकडूनही कर वसुली केली जाते. त्या स्थानिक करांच्या आधारावर दर वेगवेगळ्या राज्यात स्वतंत्र असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर ८० डॉलर प्रती बॅरल कच्चे तेल पोहोचल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या दरावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची निश्चिती केली जाते. पेट्रोलियम कंपन्यांच्या किमतीचा आढावा घेऊन दररोज किमतीमध्ये बदल करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमकडून दररोज सकाळी सहा वाजता हे बदल केले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. अशा हिशोबाने अमेरिकेचे कच्च्या तेलाचा साठा तीन वर्षाच्या न्यूनतम पातळीवर आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here