साखर कारखान्याकडून शंभर टक्के ऊस बिले अदा

अमरोहा, उत्तर प्रदेश: जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदनपूर साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये खरेदी केलेल्या ९९.२६ लाख क्विंटल उसाचे सर्व पैसे शेतकऱ्यांना अदा केले आहेत.

चंदनपूर साखर कारखान्याला गळीत हंगामामध्ये शेतकऱ्यांनी पुरवठा केलेल्या उसापोटी एकूण ३१६.६९ कोटी रुपये बँक खात्यावर जमा केले आहेत. कारखान्याने शंभर टक्के ऊस बिले दिली असल्याची माहिती यावेळी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या ग्रुपच्या इतर साखर कारखान्यांनीही शेतकऱ्यांना सर्व ऊस बिले दिली आहेत. मिलक नारायणपूर आणि रानीनांगल या साखर कारखान्याचा यामध्ये समावेश असल्याचे हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. उर्वरीत साखर कारखान्यांना लवकरात लवकर ऊस बिले अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लवकर ऊस बिले मिळावीत यासाठी ऊस विभागाने प्रयत्न चालवले आहेत, असे ते म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here