नवी दिल्ली : इंडियन गॅस एक्स्चेंजवर (आयजीएक्स) देशांतर्गत गॅसचा व्यवसाय करणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली गॅस उत्पादक कंपनी बनण्याचा मान ओएनजीसीने पटकावला आहे.
याबाबत नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ओएनजीसीने याबाबत आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हळूहळू ती आपल्या उत्पादनाच्या प्रमाणात वाढ करणार आहे. कंपनीने सांगितले की, आयजीएक्सवर देशांतर्गत गॅसचे ट्रेडिंग करणारी ओएनजीसी देशातील पहिली शोध तथा उत्पादन (ईअँडपी) कंपनी बनली आहे. पहिला ऑनलाइन व्यापार २३ मे २०२२ रोजी ओएनजीसीचे संचालक (ऑनशोर) आणि प्रभारी अनुराग शर्मा यांच्याकडून भारताच्या पहिल्या स्वयंचलित राष्ट्रीय स्तरावरील गॅस एक्स्चेंजवर आयजीएक्सवर करण्यात आला आहे.