महाराष्ट्रात फक्त ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत ५ मे २०२१ पर्यंत १७९ साखर कारखाने बंद झाले आहेत. सद्यस्थितीत ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ५ मे २०२१ पर्यंत १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात १००९.६१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०५९.३९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के आहे.

साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार, सोलापूर विभागातील ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३७ साखर कारखाने बंद झाले आहेत. नांदेड विभागातील २६ कारखाने, पुणे विभागातील २८ कारखाने तर अहमदनगर विभागातील २२ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. औरंगाबाद विभागातील १८ साखर कारखाने, अमरावतीमधील २ कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभागातील ३ कारखाने बंद झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here