रशिया आणि युक्रेन यांच्यातील रुद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या किंमतींनी उसळी घेतली आहे. तेलाचा दर ११६ डॉलर प्रती बॅरलवर गेला आहे. गेल्या ११ वर्षातील ही सर्वाधिक किंमत आहे. गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ३ टक्के वाढून ११६.३ डॉलर तर डब्ल्यूटीआय क्रूडचा दर २.६७ टक्के वाढून ११३.६ डॉलर प्रती बॅरल वाढला. ब्रेंट क्रूडमध्ये सलग चौथ्या महिन्यात तेजी आली आहे.
ब्रेंट क्रूड २०११ नंतरच्या सर्वोच्च स्तरावर आहे. ओपेक प्लस देशांनी उत्पादन न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलपासून आऊटपूट दररोजमध्ये ४ लाख बॅरलची वाढ होईल. २०१४ नंतर गुरुवारी पहिल्यांदाच कच्च्या तेलाचा दर प्रती बॅरल १०० डॉलरवर गेला. ब्रेट आणि डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये २०२२ मध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. तर सलग चौथ्या महिन्यात ब्रेंट क्रूडमध्ये तेजी दिसत आहे. भारतात सध्या दर जैसे थे आहेत. दिवाळीनंतर केंद्र सरकारने एक्साइज ड्यूटीमध्ये १० आणि ५ रुपयांची कपात केली होती. आता तेल कंपन्या तोटा भरुन काढण्यासाठी प्रती लिटर ९ रुपयांची वाढ करू शकतात. तर ब्रेंट क्रूड १८० डॉलरपर्यंत पोहोचू शकतो असे सांगण्यात येते.