उर्वरक, कीटनाशक, ट्रैक्टर च्या किंमती वाढल्या, पण ऊसाचा दर मात्र नाही : विरोधी पक्ष नेता

चंडीगढ़(हरियाणा): हरियाणा मध्ये ऊसाचा दर हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. याबाबत आता शेतकऱ्यांबरोबरच विरोध पक्ष नेतेही सरकारवर हल्लाबोल करत आहेत. नुकत्याच सादर झालेल्या बजेटमध्ये ऊस दर वाढवला नसल्याच्या कारणावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

विधानसभेत वित्त मंत्री मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपले पहिले बजेट सादर करताना म्हणाले, त्यांचे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि कृषी क्षेत्राचे भविष्य संवर्धनासाठी कटीबध्द आहे. त्यांनी जैविक आणि नैसर्गिक शेतीवर जोर देऊन शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली.

विधानसभेत विरोधी नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी हे बजेट शेतकऱ्यांसाठी काहीही उपयोगाचे नाही असे सांगून यामध्ये राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी या बजेट मध्ये कसलीही तरतूद नाही. इतकच काय खते , कीटकनाशके, ट्रॅक्टर यांच्या किंमती वाढवल्या, पण ऊस दर मात्र वाढवण्यात आलेला नाही. असे असताना कोणत्या जोरावर हे बजेट शेतकऱ्यांसाठी हितकारक असल्याचा दावा सरकार करत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, जेव्हा ते हरिणाया चे सीएम होते तेव्हा 2005 ते 2014 पर्यंत खते , कीटकनाशके आणि ट्रॅक्टर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर नव्हता. पण आता यावर जीएसटी लागू झाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here