कार्यक्षेत्राबाहेरील ऊस कारखान्यात गाळपास आणण्यास विरोध

78

कुरुक्षेत्र : साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणण्यास विरोध करत भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश बैंस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कारखान्याचे कार्यकारी संचालकांना मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले. शाहाबाद क्षेत्रातील शेतकरी बाहेरील ऊस येथे गाळपास येऊ देणार नाहीत असा इशारा देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, पंचकुला (हरियाणा) ऊस आयुक्तांनी पत्र जारी करून नारायणगड साखर कारखाना यंदा सुरू राहणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या कारखान्याचा सर्व ऊस शाहाबाद को-ऑपरेटिव्ह साखर कारखाना शाहाबादस पिकाडली साखर कारखाना भादसो आणि सरस्वती साखर कारखाना यमुनानगरला पाठविण्यात यावा असे निर्देश दिले आहेत. शादाबाद साखर कारखान्याची हंगामातील ऊस गाळप क्षमता ८० लाख क्विंटल आहे. मात्र, सद्यस्थितीत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हंगामापेक्षाही अतिरिक्त ऊस आहे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक उसाचे गाळप होऊ शकत नाही. जर बाहेरील ऊस गाळपास आला तर शेतकऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नारायणगड कारखाना सुरू करणे योग्य ठरेल. यावेळी निवेदन देताना जसबीर सिंह मामू माजरा, पवन बैंस, नवाब सिंह, प्रदीप कुमार, कुलबीर सिंह, युद्धवीर सिंह, जसबीर सिंह, सतिंद्र सिंह, सुखबीर सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here