कोल्हापूर जिल्ह्यात उसाचे पंचनामे करण्याचे आदेश

993

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिदे : 

कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या अमर्याद पावसामुळे उसाचे मोठ्याप्रमाणात नूकसान झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूरातील बाराही तालुक्‍यात महसूल विभागाच्यावतीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन पिकांचे पंचमाने केले जात आहे. जिल्ह्यात 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. आजरा, गगनबावडा, शाहुवाडी, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यात सर्वाधिक फटका बसला आहे. त्यानूसार जिल्हा प्रशासनाने तहसिल कार्यालयापासून तलाठ्यांपर्यंत सर्व यंत्रणा पंचनामे करण्यासाठी कार्यरत केली आहे.

जिल्ह्यात नदीकाठ्या 30 ते 40 हजार हेक्‍टर उसाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी उसाचे उत्पादन वाढणार हा अंदाज चुकीचा ठरणार असल्याची शक्‍यता महसूलकडून व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पंचगंगा, दूधगंगा नदीचे पाणी पात्रामध्ये गेले असल्याने पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश दिल आहे.

प्रत्येक तालुक्‍यातील तहसिलदारांना पुराच्या पाण्यामुळे आणि पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसातच हे पंचमाने पूर्ण होतील. गावागावातील ग्रामपंचायतीमध्ये नोटीसही पाठविल्या आहेत.

संजय शिंदे

निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here