साखर कारखान्यांमधील दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश

बिजनौर: ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी बिजनौरला जावून साखर कारखान्यांच्या दुरुस्तीच्या कार्याचे निरिक्षण केले. दुरुस्ती कार्यात गती आणण्याचे आदेश दिले.

बुधवारी ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी साखर कारखाना चांदपुर मधील गाव कुलचाना मध्ये सर्वेचे निरिक्षण केले. ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी याच्या नंतर साखर कारखाना चांदपुर मध्ये दुरुस्ती कार्याचे निरीक्षण केले. निरीक्षणा दरम्यान, आवश्यक दिशा निर्देश देण्यात आले. ऊस उपायुक्त यांनी 63 कॉलम सर्वे सट्टा प्रदर्शन कार्याचे गाव कल्याण कारखाना परिषद बिलाई मध्ये निरीक्षण केले. तसेच स्योहारा साखर कारखान्यातील दुरुस्तीचीही पाहणी केली. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी साखर कारखान्यांतील दुरुस्ती कार्याची पाहणी करुन हे काम लवकरात लवकर करावे असे सांगितले. तसेच सट्टा प्रदर्शनाच्या पाहणी दरम्यान ते म्हणाले की, शेतकर्‍यांना कोणतीही अडचण येता कामा नये.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here