एका आठवड्यात ऊस बिल देण्याचे आदेश, साखर कारखान्याला नोटीस

आग्रा : न्यौली साखर कारखान्यातर्फे थकीत ऊस बिलाचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे एकीकडे शेतकरी चिंतेत आहेत. तर जिल्हा प्रशासनानेही कडक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, ऊस विभागाने न्यौली साखर कारखान्याला एका आठवड्यात थकीत बिले देण्याचे निर्देश दिले आहेत.
नव्या गळीत हंगामातील पैसे देण्यात अद्याप सुरूवात झालेली नाही. मात्र, आधीच्या गळीत हंगामातील पैसे देण्याबाबत सजग झाला आहे. विभागाने त्यासाठीचे नियोजन केले आहे. न्यौली साखर कारखान्याला विभागाने नोटीस बजावली आहे. एक आठवड्यात आधीचे सर्व पैसे, थकबाकी द्यावी असे सांगण्यात आले आहे. या कामात दिरंगाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, न्यौली साखर कारखान्याचे अधिकारीही शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्यासाठी बिले तयार करण्यात गुंतले आहेत.

नव्या गळीत हंगामात ऊसाचे गाळप साधण्याच्या दृष्टने साखर कारखान्याकडून ऊस खरेदी सुरू आहे. ऊस खरेदीबरोबरच गाळपही जोरात सुरू आहेत. साखर विक्री करून शेतकऱ्यांना बिले देणअयात येणार आहेत. गेल्या गळीत हंगामात साखर कारखान्याने ५८ कोटी रुपयांची ऊस खरेदी केली होती. त्यापैकी १२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या हंगामात ३० लाख क्विंटल उस गाळपाचे नियोजन आहे. आतापर्यंत १५.७५ लाख क्विंटल ऊस खरेदी करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यौली साखर कारखाना शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस खरेदी केल्यावर गाळप बंद करेल. शेतकऱ्यांनी आपल्या तोडणी पावतीनंतर ऊस पाठवावा. शेतकऱ्यांनी काळजी करून नये. नव्या हंगामासाठी लागणीची तयारी करावी असे न्यौली साखर कारखान्याचे महासंचालक एस. पी. सिंह यांनी सांगितले.

न्यौली साखर कारखान्याला नोटीस पाठविण्या आली आहे. एक आठवड्यात थकीत बिले अदा करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर या हंगामातील ऊस बिले दिली जातील.
– ओमप्रकाश यादव, जिला ऊस अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here