बरेली: लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये पूराने कहर माजवला आहे. शेकडो लोक यामुळे चिंतेत आहेत. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी लखीमपूर खीरी जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त सर्व परिवारांना 1,525 रुपयांचे रेशन कीट तात्काळ वितरीत केले आहे. आणि या पुरामुळे नुकसान झालेल्या गावातील शेतकर्यांना ताबडतोब थकबाकी भागवण्याचे आदेश दिले. शेतकर्यांच्या मतानुसार, थकबाकी न मिळाल्यामुळे ते आधीच चिंतेत आहेत,आणि पूराने त्यांना उध्वस्त केले आहे. गेल्या आठवड्यात शारदा, घाघरा आणि मोहाना नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने डझनभर गावांतील रहिवाशांना नाइलाजाने कॅम्पमध्ये शिफ्ट व्हावे लागले. धौरहरा तहसीलमध्ये सर्वात जास्त प्रभावित गाव रैनी आहे. येथील बहुतेक घरांत आणि जवळपास सर्व पीकांना पूराच्या पाण्याने नष्ट केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.