श्री विघ्नहर कारखान्यातर्फे गुरुवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन : सत्यशिल शेरकर

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेंतर्गत गुरुवारी (दि.२१) सकाळी ९ वाजता श्री क्षेत्र ओझर येथील सांस्कृतिक भवन येथे शेतकरी मेळावा आणि बुलेट लकी ड्रॉ सोडतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली. या मेळाव्यामध्ये ‘विघ्नहर ने यापूर्वी जाहीर केलेल्या बुलेट बक्षीस योजनेनुसार बुलेट बक्षीस लकी ड्रॉ सोडत काढली जाणार आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द सिने अभिनेते सयाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

शेरकर म्हणाले की, गळीत हंगाम २०२२-२३साठी ऊस लागवड व नोंदीचा आढावा घेतला असता गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होणार नाही, असे संचालक मंडळाच्या लक्षात आल्याने ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना पूर्वहंगामी व सुरु ऊस लागवड आणि खोडवा राखण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व  २०२२-२३ च्या गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध यहावा या हेतूने लकी ड्रॉ योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांच्यामधून जे शेतकरी किमान २० गुंठे पूर्वहंगामी व सुरु उसाची लागवड करतील तसेच खोडवा राखून तो ऊस २०२२- २३ च्या गाळप हंगामात गळितास पुरवठा करतील ते शेतकरी या योजनेस पात्र राहतील. त्यांच्यामधून ६०० शेतकऱ्यांचा एक ग्रुप करून त्यांच्यामधून एक विजेता निवडला जाईल, असे ठरविण्यात आले होते.

या योजनेस ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सुमारे ८,५४७ ऊस उत्पादक या योजनेस पात्र झाले आहेत. योजनेच्या निकषाप्रमाणे एकूण १४ ग्रुप तयार झाले आहेत. त्यामुळे प्रत्येकी ६११ चे ग्रुप व ६१० चे ७ ग्रुप याप्रमाणे ८.५४७ ऊस अपादक शेतकरी १४ ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे, असेही शेरकर यांनी सांगितले. तरी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेर्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here