४२ लाख क्विंटल ऊस गाळपानंतर ओसवाल साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त

बरेली : ओसवाल साखर कारखान्याने ४२ लाख क्विंटल ऊस गाळप झाल्यानंतर बुधवारी आपल्या गळीत हंगामाची समाप्ती केली. या वर्षी कारखान्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत तीन लाख क्विंटल कमी ऊसाचे गाळप केले आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बुधवारी ओसवाल कारखान्याच्या गळीत हंगामाची समाप्ती झाली. यावर्षी कारखान्याने ४२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे गाळप तीन लाख क्विंटलने कमी आहे. गेल्या वर्षी कारखान्याने ४५ लाख क्विंटलचे गाळप केले होते. तर कारखान्याने डिसेंबरअखेर पर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिले दिली आहेत. कारखान्याचे सरव्यवस्थापक बी. एन. मिश्रा यांनी सांगितले की, बुधवारी गळीत हंगामाची समाप्ती झाली. शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंतची बिले अदा केली आहेत. उर्वरीत बिले साखर विक्रीनंतर दिली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here