उत्तर प्रदेशातील ऊसाची लोकप्रिय प्रजाती Co – ०२३८ वर होतोय परिणाम

लखनौ : कोईंबतूर ऊस संशोधन संस्थेचे माजी संचालक बख्शी राम यांच्यातर्फे विकसित आणि २००९ मध्ये उत्तर भारतीय राज्यांमध्ये जारी करण्यात आलेल्या Co-०२३८ प्रजातीवर लाल सड रोगाचा फैलाव होत आहे. २०२०-२१ मध्ये Co-०२३८ प्रजाकीने युपीतील ८८ टक्के ऊस क्षेत्र व्यापले आहे. यापूर्वी २०१३-१४ मध्ये ते तीन टक्के होते.

Co-२३८ ही अधिक उत्पादन देणारी प्रजाती आहे. साखर कारखाने याच्यातील उच्च सुक्रोजमुळे त्याला अधिक पसंती देतात. सुक्रोजचे प्रमाण जेवढे अधिक असेल, उतारा तेवढा अधिक असतो. उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा २०१०-११ मध्ये ९.०७ टक्क्यांवरून वाढून २०१९-२० मध्ये ११.७३ टक्के झाला आहे. गेल्यावर्षी हा उतारा ११.४३ टक्के होता. गेल्या आठ वर्षामध्ये, उत्तर प्रदेशचे वार्षिक साखर उत्पादन महाराष्ट्राच्या ८६ लाख टनाच्या तुलनेत सरासरी ९६ लाख टन राहिले आहे. मात्र Co-०२३८ प्रजाती लाल सड रोगाला बळी पडते, याला उसाचा कॅन्सरही म्हटले जाते. याचे संक्रमण इतके व्यापक आहे की ऑगस्ट महिन्यात युपीमध्ये राज्यस्तरीय बियाणे निवड समितीच्या बैठकीत इतर प्रजातींचा वापर हा एक व्यावहारिक पर्याय मानला गेला आहे. रेड रॉट रोगाचा फैलाव इतका व्यापक आहे की, शेतकऱ्यांना Co-०११८, CoLK -९४१८४, Co-१५९२३ आणि CoLK-१४२०१ यांसारख्या प्रगत प्रजातींचे उत्पादन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here