ऊसावर अमेरिकी फाल आर्मी वर्म किटकाचा प्रादुर्भाव

शहांजहापूर : ऊसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. अमेरिकी मूळ असणारे विनाशकारी कीटक फाल आर्मी वर्म ऊसाच्या पिकाचे नुकसान करत आहे.

ऊस शोध परिषदेचे निदेशक डॉ. जे. सिंह यांनी सांगितले की, फॉल आर्मवर्म किटकाचा प्रादुर्भाव उत्तर प्रदेशातील पश्‍चिमी क्षेत्रात पहायला मिळत आहे. हे कीटक मुख्यत्वे मक्याच्या पीकाचे नुकसान करते. पण मक्याच्या पिकाची अनुपलब्धतेच्या परिस्थितीत हा ऊस , ज्वारी व इतर पीकांवर आक्रमण करतो. आपल्या देशामध्ये ऊसाच्या पीकांमध्ये या किटकाचा प्रादुर्भावर सर्वप्रथम तामिळनाडू राज्यात दिसून आला.

डॉ. जे सिंह यांनी संगितले की, हे किटक खूप लांबपर्यंत उडू शकतात. शिकारीच्या शोधात 100 किलोमीटर पेक्षा अधिक लांब उडू शकतात. या किटकांच्या चार अवस्था असतात. लार्वा (सूडी), प्यूपा आणि वयस्क. या किटकाचा मादा 1000 पेक्षा अधिक अंडे देतो, जो 50-200 च्या अंड्यांच्या समुहांमध्ये असतात.
फाल आर्मी वर्म कीटकांच्या अंड्यापासून 4-6 दिवसांमध्ये सूडी निघते. सूडी अवस्था 14-18 दिवसांची असते आणि या अवस्थेमध्ये हे कीटक पीकाचे नुकसान करते. सूडी ची त्वचा मउ असते. जी वाढवण्या बरोबरच हलक्या हिरव्या किंवा गुलाबी रंगाची होते. सूडी नवजात रोपांच्या गोफाचे नुकसान होते. तसेच रोपांच्या मध्यशिरा सोडून पूर्ण पात खाते.

फाल आर्मी वर्म कीटकावर नियंत्रणासाठी निदेशक ने सांगितले की, क्वीनालफास 25 ईसी दर 800 मिली आहे किंवा प्रोफेनोफास 40 टक्के साईपर 4 टक्के दर 750 मिली आहेे. किंवा क्लोरपायरीफास 20 टक्के ईसी दर 800 मिली आहे. या सार्‍याला 625 मिली पाण्यात मिसळून त्या पाण्याची फवारणी रोपांवर केली पाहिजे. जे सिंह यांनी सांगितले की, याची सूडी च्या तिसर्‍या आणि चौथ्या इंस्टार मुळे नुकसान झाल्यामुळे क्लोरेन्ट्रोनिलिप्रोल 18.5 एससी दर 250 मिली प्रति हेक्टर ला 6.25 लीटर पाण्यामध्ये घालून फवारणी केल्यास या कीटकाला नियत्रीत केले जावू शकते.

ऊस शोध परिषद चे निदेशक यांनी शेतकर्‍यांना सल्ला दिला की, ऊस विकास परिषद किंवा परिषद हेल्पलाइन 05842-222509 किंवा कीटक वैज्ञानिक डॉ. अरुण सिंह मो. 6389025350 यावर संपर्क करा.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here