किडीच्या प्रादूर्भावामुळे हरियाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शक्य

चंडीगड : हरियाणातील ऊस उत्पादकांना किडीच्या हल्ल्यामुळे खराब झालेल्या पिकामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कर्नालच्या नीलोखेडा येथे १३ एकरमधील ऊस शेती करणारे शेतकरी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, मी आतापर्यंत एक एकर ऊस लावला आहे. गेल्या वर्षी ४०० क्विंटलच्या सरासरी उत्पादनात २५० क्विटंल प्रती एकरची घट झाली आहे. यमुनानगरचे आणखी एक शेतकरी रोशन लाल यांनी सांगितले की, त्यांनी यावर्षी लावलेल्या आपल्या २६ एकर ऊस शेतीत जवळपास ३०-३५ टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या वीस वर्षात मी इतके मोठे नुकसान पाहिलेले नाही. त्यामुळे यावर्षी बहूतांश शेतकरी ऊस शेती सोडून इतर पिकांकडे वळतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय, यावर्षी उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी कीटकनाशकांवर खर्च करावा लागला आहे. मात्र काहीच फायदा झालेला नाही. हरियाणा राज्य कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार ऊसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या ९९,००० हेक्टरवरुन वाढून १.१० लाख हेक्टर झाल्यानंतरही राज्यात उसाचे उत्पादन गेल्यावर्षीच्या ८५.३२ लाख टनावरुन ८४.५० लाख टन होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, अधिकाऱ्यांना गेल्यावर्षीच्या ८६१ क्विंटलच्या तुलनेत ७६८ क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. २०१६-१७ नंतर हे उत्पादन सर्वात कमी असेल. राज्यातील सर्व सहकारी आणि खासगी कारखान्यांत गाळप सुरू झाले आहे. कमी पिकामुळे राज्यातील बहुतांश कारखान्यांना आपले उद्दीष्ट पूर्ती करण्यात अडचणी येतील असे साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here