ओम्रीकॉनचा कहर, ब्रिटनमध्ये रुग्णांचा उच्चांक

कोविड १९चा नवा ओम्रिकॉन व्हेरियंट आता जगभरात धुमाकूळ घालत आहे. याची तिव्रता अमेरिकेत अधिक आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाने सर्व उच्चांक मोडले आहेत. तर अमेरिकेत एका दिवसात कोविडचे रुग्ण दुप्पट झाले आहेत. ब्रिटनमध्ये बुधवारी ७८,६१० नवे ओम्रीकॉनचे रुग्ण आढळले. जवळपास बारा महिन्यानंतर इतके रुग्ण आढळले आहेत. यावर्षी ६ जानेवारी रोजी ६८,०५३ रुग्ण आढळले होते. तेव्हा ब्रिटनमध्ये लॉकडाऊन होता.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओम्रीकॉन दुप्पट गतीने वाढत असल्याचा इशारा दिला आहे. त्याला रोखण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. बुस्टर डोस वाढवला पाहिजे असे त्यांनी सांगितले. ओम्रीकॉनच्या संकटापासून बचावासाठी लसीकरणावर जोर दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी ब्रिटनमध्ये ५९,६१० रुग्ण आढळले. मात्र, एका दिवसात २० हजार रुग्ण आढळल्याने घबराट उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here