मुजफ्फरनगर : खतौली साखर कारखान्यासह कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी ऊसाचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये अनेक गावांमध्ये ऊसावर पोक्का बोईंग रोगाचा फैलाव झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना उपाय योजना सुचविल्या आहेत. औषधांबरोबर पावसाच्या कालावधीत पिकाची देखभाल गरजेची असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्याच्या कृषी संशोधन केंद्रातील वैज्ञानिक डॉ. ए. के. डागर यांच्या नेतृत्वाखालील पथकासह साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील गावांचा दौरा केला. यावेळी भैंसी, मथेडी, रायपूर नगली, फुलत, सठेडी, टबीटा, टिटौडा, ककराला, चांदसमंद, गालिबपूर, मीरापूर दलपत, तुलसीपूर, याहियापूर, भलवा, अंतवाडा, लिसौडा, लाडपूर, जावन खानपूर आदी गावांतील ऊस पिकाची पाहणी करण्यात आली. सध्या उसावर टॉप बोरर रोगाचा फैलाव आहे. तो वाढण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्याला आळा घालण्यासाठी कोराजन अथवा फर्टेराचा वापर करावा. काही ठिकाणी पोक्का बोईंगचा प्रादुर्भाव आढळला. त्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराइड औषध १५ दिवसांनी दोनवेळा फवारणी करावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक कुलदीप राठी, उप महाव्यवस्थापक ए. के. सिंह, नीरो श्रीवास्तव, प्रदीप कुमार, धर्मेद्र कुमार, शिव कुमार पुंडीर, देवेंद्र कुमार व भूपेंद्र उपस्थित होते.