टोडरपूर साखर कारखाना चालविण्यासाठी रुपरेषा तयार

77

सहारनपूर : शेतकरी संघटनेच्या बॅनरअंतर्गत सुल्तानपूरमध्ये शेतकरी आणि कामगारांची बैठक झाली. यावेळी आठ वर्षांपासून बंद पडलेला टोडरपूर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठीच्या आंदोलनाची रुपरेषा तयार करण्यात आली. जर सर्वजण एकत्र आले तर या समस्येचा तोडगा काढणे शक्य आहे अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. सुलतानपूरमधील एका सभागृहात शेतकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर पूर्णसिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते म्हणाले की, जर राज्य सरकार ११९ साखर कारखाने चालवू शकत असेल तर एक साखर कारखाना चालवणे त्यांच्यासाठी अवघड आहे का. याबाबत जर आपण योग्य पद्धतीने आंदोलन केले तर हा कारखानाही सुरू होऊ शकेल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ठाकूर पूर्ण सिंह म्हणाले की, यासाठी आंदोलनाची तारीख निश्चित करावी. कारखान्यासमोर आंदोलन करण्याऐवजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अथवा आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे. तरच शेतकऱ्यांची समस्या लवकर विचारात घेतली जाईल. संघटनेचे जिल्हाध्यक्ष ठा. अजब सिंह म्हणाले की, एकतेमध्ये मोठी ताकद आहे. शेतकरी, कामगारांच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यासाठी सर्वांनी आपल्या हक्कांसाठी लढण्याची तयारी ठेवावी. यावेळी शेतकरी नेते देशपाल खेडी, विभाग अध्यक्ष सोनू उमरपुर, तालुकाध्यक्ष शामली जलसिंह, सीताराम सैनी, शाकंभरी साखर कारखाना युनियनचे मंत्री ओमप्रकाश, रजनीश श्रीवास्तव, प्रवीण राणा आदींची भाषणे झाली. मुख्य सल्लागार बिजेंद्र सिंह, चमन लाल सैनी, प्रकाश चंद सैनी, रणधीर सिंह, वेद पाल सैनी, पुन्नाराम, जयचंद सैनी, ऋषी पाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here