साखर कारखाना चालू न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आक्रोश

114

साथा साखर कारखाना वेळेत सुरु न झाल्याने ऊस शेतकर्‍यांमध्ये खूप आक्रोश आहे. बरौली विधानसभा क्षेत्रातील आमदार दलवीर सिंह यांनी महाव्यवस्थापकांना भेटून नाराजी व्यक्त केली.

ठाकुर दलवीर सिंह साखर कारखान्यात आले आणि त्यांनी दुरुस्तीचे काम पाहिले. आमदारांनी कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत रजिस्टर चेक केले. अनेक कर्मचारी अनुपस्थित होते. त्यांनी सांगितले की, काही कर्मचारी सरकारला बदनाम करण्याच्या विचाराने वेळेत आणि जबाबदारीने आपले काम करत नाही. सरकारने कारखान्याच्या दुरुस्तीसाठी 2 करोडपेक्षा अधिक पैसे दिले. आमदारांनी साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वेळेवर काम न झाल्याची माहिती ऊसमंत्री सुरेश राणा तसेच विभागाचे अपर मुख्य सचिव यांना फोनवर दिली. तसेच अनुपस्थित कर्मचार्‍यांविरोधात कडक कारवाई साठी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले.

आमदारांनी सांगितले की, सध्या सरकार शेतकर्‍याप्रति संवेदनशील आहे. शेतकर्‍यांचा एक एक ऊस सरकार खरेदी करुन गाळप करणार आहे. दोषीं कर्मचार्‍यांच्या विरोधार कडक कारवाई केली जाईल. प्रमुख सचिवांनी सोंमवारी तंत्रविशेषज्ञांच्या पथकाला कारखान्यात पाठवणे आणि मंगळवारपर्यंत कारखाना सुरु करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान विजय कुमार सिंह, सुशेील गुप्ता, अरविंद सिंह, शिवनारायण शर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here