साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची शेतकऱ्यांची गोवा सरकारकडे मागणी

पणजी : गोव्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी दिलेल्या आश्वासनाबाबत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

याबाबत डिजिटल गोवामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी २४ नोव्हेंबर रोजी संजीवनी साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी सरकारने आपल्या कारखान्याबाबतच्या भविष्यातील योजनांबाबत भूमिका स्पष्ट करावी असे सांगितले आहे.

दरम्यान राज्य सरकारकडून साखर कारखान्याच्या जमिनीवर उभारण्यात येणारा ट्रक टर्मिनल, फॉरेन्सिक कॉलेज आदींबाबतही आक्षेप नोंदवला आहे. गोव्यातील एकमेव साखर कारखाना तोट्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडला आहे. त्यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांना आपला ऊस शेजारील कर्नाटक राज्यात घेवून जावा लागतो. गोवा सरकारने संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here