चायना शुगर एक्स्पो मध्ये ८०० कंपन्यांनी घेतला सहभाग

706

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

नँनिंग, 27 मे: चायना शुगर एक्स्पो हा चीनच्या नानिंग शहरामध्ये संपन्न झाला. या एक्स्पोमध्ये जगभरातून ८०० पेक्षा अधिक साखर उद्योगाशी संबधित कंपन्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला होता, ज्यामध्ये साखर उद्योगातील तज्ञ आणि व्यावसायिक लोक असे मिळून जवळपास ३०००० लोकांची उपस्थिती होती. हा एक्स्पो तीन दिवसांचा होता आणि त्यामध्ये १०० पेक्षा जास्त प्रकारच्या उत्पादनांचे प्रदर्शन झाले.

सदर एक्स्पो चालू असताना चोन्ग्ज़ुओ या शहरने १३ प्रकारच्या विविध प्रकल्पावर करार करून स्वाक्षरी करण्यात आल्या.

याच एक्स्पोमध्ये जागतिक साखर परिसंवाद या कार्यक्रमाचे पण आयोजन करण्यात आला ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटना, ब्राझिलियन ऊस इंडस्ट्री असोसिएशन, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, आणि इतर कंपन्या आणि जगभरातील तज्ञ साखर उद्योग सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here