दोन लाखापेक्षा अधिक ऊस कामगार करणार संप

सूरत(गुजरात) : दक्षिण गुजरातमधील ऊस कामगार 28 फेब्रुवारीपासून पगारवाढीसह अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप करणार आहेत. या कर्मचार्‍यांमध्ये बहुतेक लोक आदिवासी आहेत. त्यांनी गुजरातमध्ये मजूर अधिाकर मंच च्या नेतृत्वाखाली अनिश्‍चित काळासाठी संपाचे हत्यार पुकारले आहे.

दक्षिण गुजरातमध्ये जवळपास 15 साखर कारखान्यांच्या ऊसतोडणी मध्ये 2 लाख मजूर काम करतात, मजूर अधिकार मंचकडून ऊस तोड कामगारांना संघटीत केले जात आहे. मंचाचे सल्लागार सुधीर कटियार यांच्या म्हणण्यानुसार , ऊस कामगार तीन राज्यातील 12 जिल्ह्यातून येतात. सर्व कामगारांचे शोषण होत आहे आणि त्यांची अर्थिक, सामाजिक स्थिती मध्ये सुधारणा नाही. ते म्हणाले, आम्ही साखर कारखान्यांच्या मालकांकडे, राज्यस्तरीय महासंघ आणि श्रम विभागाला कामगारांच्या मागण्यांचे निवेदन पाठवले आहे.

ट्रेड यूनियन नेता जयेश गामित यांनी सांगितले की,ऊस कर्मचारी मजूरीत प्रति टन 400 रुपयांची वाढ मागत आहे, जी यूनियन नेत्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या 250 रुपये आहे. दोन मजूरांना एक टन ऊस तोडणीसाठी जवळपास 12 ते 14 तास लागतात, आणि हे काम कठीण असते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथे उस चांगला झाला आहे. दर वर्षी जवळपास दोन लाख श्रमिक गुजरात च्या डांक आणि तापी जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून ऊसतोडणीच्या कामासाठी येतात. एकूण मजूरांच्या संख्येमध्ये डांग येथील भागीदारी 40 टक्के आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here