हापुड : शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि कुपनलिकांना मोफत विज देण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनच्या हापुर शाखेने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
‘भाकियू’चे जिल्हाध्यक्ष इंद्रजीत सोळंकी म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जाहीरनाम्यामध्ये कूपनलिकांना मोफत विज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, शेतकऱ्यांना या आश्वासनाची अद्याप पुर्तता करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात दोन साखर कारखाने आहेत. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऊस बील तत्काळ मिळावे, अशी मागणी करण्यात आली.