साखर कारखान्यांच्या सहयोगाने उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यात ऑक्सिजन जनरेटर स्थापन होणार

196

लखनऊ: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार राज्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर आता अबकारी तसेच साखर उद्योग विभाग, ऊस विकास विभागाने राज्यातील कोरोना रुग्णांना वाचविण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन जनरेटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ७५ जिल्ह्यांमधील ७९ हॉस्पिटल्समध्ये हे जनरेटर असतील. यामध्ये शहरी, ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या सुविधेच्या माध्यमातून अबकारी तसेच साखर उद्योग विभागाकडून ३५०० बेडसाठी ऑक्सिजन पुरवठा होईल.

ऑक्सिजन जनरेटर स्थापन करण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला सुमारे ५०-६० लाख रुपये खर्च येणार आहे. संबंधित जिल्हाधिकारी आणि मुख्य आरोग्य अधिकारी अबकारी युनीट आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून याची पूर्तता करतील. हे मशीन तातडीने आणण्यासाठी एअर इंडियाला पत्र पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन जनरेटर तत्काळ एअरलिफ्ट करणे शक्य होईल. अबकारी, साखर उद्योगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांी सांगितले की, ऑक्सिजन जनरेटर बसविण्याचे आदेश ५४ कंपन्यांना याआधीच देण्यात आले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here