INX मीडिया केस: पी चिदंबरम यांना अटक

नवी दिल्ली : आयएनएक्स मिडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, 30 तासांनी रात्री उशिरा नाट्यमयरित्या काँग्रेस मुख्यालयात आले. तेथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी रवाना झाले, पण केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने पाठलाग करत त्यांना बुधवारी रात्री अटक केली. यानंतर सीबीआय पथकाने त्यांना मुख्यालयात नेले.

इतर वरिष्ठ मंत्र्यांसह माजी मंत्र्यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे संचालक रिषीकुमार शुक्ला स्वत: उपस्थित होते. सार्‍या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी त्यांना सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले. अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम आपल्या घरी आले. यावेळी सीबीआयच्या अधिकार्‍यांनी इमारतीच्या कंपाउंडवरुन उड्या घेत आत प्रवेश केला.

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करीत उचलून नेले. चिदंबरम जोरबागेत आल्याच्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यावेळी वकिलांचे पथक तेथे उपस्थित असल्याचे, सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यापासून सीबीआय कर्मचार्‍यांची टीम चिदंबरम यांच्या घराबाहेर पाळत ठेवून होती.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here