पद्मश्री डॉ. विखे-पाटील कारखान्यात साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन

अहमदनगर : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. उत्पादित झालेल्या साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन करण्यात आले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे यांनी केले. कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले.

चेअरमन तांबे म्हणाले की, कारखान्याने यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २,७००० रुपये दर देवून मोठा दिलासा दिला. बाहेरून आणलेल्या ऊसाला देखील तेवढाच भाव देण्याचा मंत्री विखे पाटील यांचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली. यंदा गळीत हंगाम वेळेत सुरू झाल्याने गाळपाचे नियोजन यशस्वी होईल. या नियोजनानुसार गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन वाढावे म्हणून प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. कारखान्याने पुढील वर्षीचा दर जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी ट्रक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी, कारखान्याचे व्हा. चेअरमन सतीश ससाणे, संजय आहेर, दादासाहेब घोगरे, सुभाष अंत्रे, साहेबराव म्हस्के, कामगार संचालक ज्ञानदेव आहेर, अमोल थेटे, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह सर्व संचालकांच्या उपस्थितीत पोत्यांचे पूजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here