लाहौर: पाकिस्तान मधील पंजाब चे मुख्यमंत्री सरदार उस्मान बूजदार यांनी गु़रुवारी साखरेच्या दरांमध्ये झालेल्या कृत्रिम वाढीवर तिव्र नाराजी व्यक्त करुन प्रशासन आणिअन्न विभागाला होर्डर्स आणि अवैध तस्करांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांनी निश्चित दरांवर खुल्या बाजारांमध्ये आपल्या उपलब्धतेसह साखरेच्या पुरवठ्यामद्ये सुधारणा करण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, साखरेची उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही आणि साखरेला अत्याधिक दरांवर विकण्याची अनुमित दिली जाणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ मंत्री अद्बुल अलीम खान यांना एका पत्रात लिहिले आहे की, विभागीय मुख्यालयांमध्ये जावून साखरेचे स्टॉक, पुरवठा आणि दरांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत आणि आठवड्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला सुपुर्द करण्यासही सांगितले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.