कराची : सरकारने साखर, गोड शितपेयांवरील कर वाढवावा अशी मागणी आरोग्य तज्ज्ञ, आरोग्य संशोधक आणि जागतिक रोग विरोधी समितीच्या सदस्यांनी केली. असंसर्गजन्य रोगांवर राष्ट्रीय कृती योजना लागू करावी आणि सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शारीरिक उपक्रम अनिवार्य करावेत असे आवाहन तज्ज्ञांनीकेले आहे.
आरोग्य क्षेत्रातील एक्स्पर्ट्सच्या मते पाकिस्तानमध्ये एखाद्या महामारीपेक्षाही अधिक फैलाव मधुमेहाचा झाला आहे. ३३ मिलियन लोक याच्याशी सामना करीत आहेत. डायबिटीस असोसिएशन ऑफ पाकिस्तानचे (डीएपी) महासचिव प्रा. डॉ. अब्दुल बासित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा आजारा रोखण्यासाठी जर तत्काळ उपाय योजना केली गेली नाही, तर मधुमेही रुग्णांची संख्या २०४५ पर्यंत ६० मिलियनपर्यंत वाढू शकते. आरोग्य मंत्रालयाने शर्करायुक्त पेयांवरील करात वाढीची शिफारस केली आहे. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही.