पाकिस्तान : कमी पिक, अधिक उत्पादन खर्चामुळे कारखान्यांसमोर संकट

पेशावर : कमी ऊस पिक आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे विभागातील साखर कारखान्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. कारखान्यांसमोर आर्थिक संकट घोंघावत आहे. अलिकडेच या विभागात पाऊस झाला. मात्र गेले वर्षभर हवामान कोरडे होते. त्यामुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. कीटकांनी पिकाचे मोठे नुकसान केले आहे.

ऊसाचे गुणवत्तेनुसार वेगवेगळे प्रकार असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, कारखाने सर्व प्रकारच्या उसाला एकच दर देतात.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चांगले पिक घेण्यासाठी डीएपी खताची गरज आहे. मात्र, गेल्या वर्षभरात त्याचा दर ४००० रुपयांनी वाढून ९००० रुपये प्रती ४९ किलो झाला आहे. युरीयाचा दर वर्षभरात १८०० रुपयांनी वाढून २७०० रुपये प्रती ४९ किलो झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर कारखाने देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, शेतकरी ऊस विक्री करण्यास तयार नाहीत. ५० किलो ऊस उत्पादनासाठी ४०० रुपये खर्च आला असताना २८०ते ३०० रुपयांना तो विक्री का करायचा असा त्यांचा सवाल आहे. स्थानिक गुळ उत्पादन रिफायनरी शेतकऱ्यांना चांगला दर देत आहेत. त्यामुळे शेतकरी कारखान्यांऐवजी गुळ उत्पादनासाठी आपले पिक देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here