पाकिस्तान : सरकारकडे साखर साठवणुकीच्या गोदामांचा तुटवडा

इस्लामाबाद : सरकारने देशांतील साखर कारखान्यांकडून ०.५ मिलियन टन साखर खरेदी करून साठा वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, ही साखर साठवून ठेवण्यासाठी सरकारकडे जागेची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, सरकारकडे साखरेसाठी साठवणुकीच्या जागेची कमतरता आहे. अशा प्रकारची जागा सद्यस्थितीत उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने जर ही साखर खरेदी केली तर अडचण उद्भवू नये यासाठी नवे पर्याय शोधावे लागणार आहेत.

सरकारकडे रमजान अथवा जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये गरजेनुसार पुरेशी साखर असेल. अर्थ मंत्रालयाने बुधवारी केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, अर्थ आणि महसूल मंत्री शौकत तारिन हे राष्ट्रीय मूल्य देखरेख समितीच्या (एनपीएमसी) बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. एनपीएमसीने देशातील साखरेच्या दरावरही चर्चा केली. गेल्या आठवड्यात साखरेच्या किमतीत किरकोळ घट दिसून आली आहे. याशिवाय अध्यक्ष शौकत तारीन यांनी उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाला भविष्यात किमती स्थिर राहाव्यात यासाठी साखरेच्या साठवणूक धोरणाला गती देण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here