देशातील साखरेच्या किमती स्थिर असल्याचा पाकिस्तानचा दावा

कराची : साखरेच्या किमतीमध्ये वाढ झाल्याच्या वृत्ताचा उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाने खंडन केले आहे. साखरेच्या किरकोळ बाजारपेठेत ८५ रुपये प्रती किलो असा दर आहे. तर घाऊक बाजारपेठेत साखर ८२ रुपये प्रती किलो दराने उपलब्ध असल्याचे मंत्रालयाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, आम्ही साखरेच्या दरवाढीबाबतची सर्व वृत्ते फेटाळत आहोत, की जी तथ्यहीन आहेत. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, कराचीच्या जुरीया बाजार, लाहोरची अकबरी मंडी, इस्लामाबादमधील साखरेच्या दराची तपासणी करण्यात आली आहे. येथे सरकारकडून निर्धारीत केलेल्या दराचा वापरच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंत्रालयाने सांगितले की, सरकारच्या धोरणानुसार, युटिलिटी स्टोअरवर खरेदी करताना सीएनआयसी दाखवणे अनिवार्य आहे. तरच किमी किमतीवर लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, देशभरात युटिलीटी स्टोअर्सवर साखर ८५ रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. काही ठिकाणी ९४ रुपये दर आकारणी केली जात असल्याचे वृत्त होते. अशा ठिकाणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here