रहीम यार खान : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ५६ झांग आणि ८४ या प्रजातीचा ऊस खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. याबाबत जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाकिस्तानातील पंजाबचे ऊस आयुक्त जमां वट्टू यांची भेट घेतली आणि याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांनी ऊस आयुक्तांना सांगितेल की, रहीम यार खान येथील सर्व पाचही साखर कारखान्यांनी वेळवर ऊसाची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडे ५६ झांग आणि ८४ या बियाणी उपलब्ध केली होती. मात्र, आता पिक तयार असताना साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, सिँध येथील साखर कारखाने शेतकऱ्यांकडून २५० रुपये प्रती ३७ किलो या दराने ऊस खरेदी करत आहेत. मात्र, पंजाबमधील साखर कारखाने २२५ रुपये दराने ऊस खरेदी करत आहेत.