पाकिस्तान: 44 साखर कारखान्याच्या मालकांना पाठवण्यात आली नोटीस

86

लाहौर, पाकिस्तान: पंजाब भ्रष्टाचार निरोधक प्रतिष्ठान (ACE) ने 44 साखर कारखाने आणि त्यांच्या मालकाना नोटीस पाठवली आहे. जवळपास दोन आठवडयापूर्वी ACE ने साखर कारखान्याच्या मालकांविरोधात जागरूकता अभियान सुरु केले होते. आतापर्यंत ACE ला कमीत कमी 2,507 तक्रारी मिळाल्या आहेत. ज्यामध्ये सरकार द्वारा निर्धारित कीमतींच्या तुलनेत कमी दरांबाबत 1,363 तक्रारी मिळाल्या आणि 641 तक्रारी प्रलंबित असणाऱ्या थकबाकी संबंधित होत्या. कमीत कमी 503 तक्रारी अनुचित कपाती संदर्भात होत्या. सर्वात जास्त तक्रारी पाकिस्तान च्या दक्षिण पंजाबातून आल्या आहेत.

ACE डीजी गोहर नफीस यांनी सांगितले की, एसीई ऊस उत्पादकांसाठी खुल्या कोर्टची व्यवस्था करत आहे. याबाबात महा निदेशक यांनी सांगितले की, ते कोणत्याही किमतीत शेतकऱ्यांचे शोषण सहन करू शकत नाहीत. त्यांनी सांगितले की, एसीई प्रांतातील शेतकऱ्यांबरोबर झालेल्या अन्यायाची भरपाई करण्याचा प्रयत्न करतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here