पाकिस्तान: देशातील १६ बड्या शहरांमध्ये साखर १०० रुपयांवर

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखरेचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत.
देशातील सोळा बड्या शहरांमध्ये साखरेचे दर १०० रुपये प्रती किलो झाले आहेत. सांख्यिकी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात साखरेच्या किमतीत प्रती किलो १० रुपयांची वाढ पहायला मिळाली आहे. लाहोर आणि बहावलपूरमध्ये प्रती किलो ५ रुपयांची दरवाढ झाल्याचे सांख्यिकी विभागाने सांगितले. तर सरगोधा, बन्नू आणि सुक्कूरमध्ये प्रती किलो ४ रुपये दरवाढ झाली. इस्लामाबाद आणि कराचीमध्ये नागरिकांकडे महाग साखर खरेदी करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. महागाई कमी करण्याची मागणी लोकांनी सरकारकडे केली आहे.

पाकिस्तान सरकारला साखरेच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सरकार साखर आयात करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने २०२० मध्ये साखरेच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक साखरेचे दर कमी करण्यासाठी आयातीस मंजुरी दिली. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने गेल्या काही महिन्यांत साखर खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या.
सद्यस्थितीत पाकिस्तानातील साखर उद्योग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. देशात साखरेची टंचाई ही सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे साखर उद्योगावर अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here