विक्री करामुळे साखर दरवाढीचा पाकिस्तान शुगर मिल्स असोसिशएनचा आरोप

इस्लामाबाद : साखरेच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीला रुपयाचे अवमूल्यन, विक्री दरात झालेली वाढ यांसह ऊस दर हे कारणीभूत असल्याचा आरोप पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (पीएसएमए) केला आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या अखेरीपासून सातत्याने साखरेचे दर वाढत आहेत. तर पीएसएमएने रुपयाच्या अवमूल्यनाला साखरेच्या दरवाढीस जबाबदार ठरवले आहे. पीएसएमएने सांगितले की, विक्री दरात ८ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत करण्यात आलेली वाढ, गेल्या काही वर्षांपासून सवलतीचा दर ७ टक्क्यांवरून १३.२५ टक्क्यांवर आणला गेला. तसेच ऊसाच्या दरातील वाढ यामुळे साखरेच्या दरात वाढ होत आहे. पीएसएमएने आपल्या वार्षिक अहवाल २०२० मध्ये या मुद्द्यांची मांडणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here