पाकिस्तान: नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात उसाचे गाळप सुरु होईल

इस्लामाबाद : पाकिस्तान च्या पंजाब आणि सिंध प्रांत पुढच्या महिन्यापासून उसाचे गाळप सुरु करतील, आणि गाळपामधील विलंबासाठी कारखान्यांवर दंड लावला जाईल. अधिकार्‍यांनी राष्ट्रीय मूल्य देखरेख समितीला सांगितले की, पंजाबमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उसाचे गाळप सुरु होईल, ज्यामुळे उसाचे वेळेवर गाळप होण्यात गती येईल. सिंधमध्ये नोव्हेंबरच्या मध्यात गाळप सुरु होईल.

बैठक़ीमध्ये सांगितले की, ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान (टीसीपी) 151,700 टन साखरेची आयात करेल. पाकिस्तान मध्ये 4 नोव्हेंबर पर्यंत 445,000 टन खाजगी डॉलर स्टॉक उपलब्ध आहे, तर सिंध उस आयुक्तांनी 565,000 टन साखरेच्या एकूण स्टॉक ची सूचना दिली आहे. विशेष सचिवांनी सांगितले की, आवश्यक वस्तुंची होलसेल आणि रिटेल किमतीमधील अंतर प्रांतांसाठी एक गंभीर आव्हान बनले आहे. सचिवांनी प्रांतीय सरकारकडून मुलभूत वस्तुंमध्ये अनुचित लाभ मार्जिन ची तपासणी करण्यासाठी सुधारात्मक उपाय करण्याचा आग्रह केला. त्यांनी सांगितले की, प्रांतीय सरकार ला दरातील असमानता दूर करुन सक्रिय भूमिका निभावण्यासाठी जिल्हा प्रशासनच्या सहयोगाने बाजार समितीला सहकार्य करावे. सचिवांनी जिल्हा प्रशासनाला आव्हान केले की, ते टोमॅटो, आले, गहू आणि साखर सारख्या आवश्यक वस्तुंच्या किंमतींवर नियंत्रण ठेवावे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here