पाकिस्तान : ऊस हंगाम १५ नोव्हेंबरपासून होणार सुरू

278

लाहोर : पाकिस्तान सरकारने दक्षिण पंजाबमध्ये १५ नोव्हेंबरपासून आणि इतर विभागांमध्ये २० नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

पंजाबच्या अन्नधान्य विभागाच्या सचिवांकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, पंजाब साखर कारखाने नियंत्रण अधिनियम १९५० (१९५०चे XXII) चे कलम ८ अन्वये पंजाबच्या राज्यपालांकडून ऊसाच्या गळीत हंगामाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. दक्षिण पंजाबमधील साखर कारखाने १५ नोव्हेंबर २०२१ नंतर उसाचे गाळप सुरू करतील. तर पंजाबच्या इतर प्रांतातील साखर कारखाने २० नोव्हेंबरनंतर आपला ऊस गाळप हंगाम सुरू करणार आहेत.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here