पाकिस्तान सरकारने शुक्रवारी ५,००,००० टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी संघ राज्यांचे अर्थ आणि महसूल मंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी पाकिस्तानी शुगर मिल असोसिएशन (PSMA) चे केंद्रीय अध्यक्ष मुहम्मद जका अशरफ चौधरी यांना तातडीने बोलावून बैठक घेतली. यावेळी PSMA चे महासचिव डॉ. हसन इकबाल आणि इतर सल्लागार उपस्थित होते.
सरकारने पहिल्या प्प्यात २,५०,००० साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. आणि दुसऱ्या टप्प्यात २,५०,००० टन साखर निर्यात केली जाणार आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची प्रती टन किंमत USD560 आहे. त्यामुळे ५,००,००० टन साखर निर्यात केल्यानंतर पाकिस्तानला USD280 million महसूल मिळणार आहे.