कर्ज मिळविण्यासाठी पाकिस्तानची आयएमएफकडे याचना, श्रीलंकेनंतरही हा देश बुडणार

पाकिस्तानची आता केवळ आयएमएफवर मदार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानचे, जवळचे देशही मदतीस पुढे येत नसल्याची स्थिती आहे. चीन, यूएईसह अनेक देश आता पाकिस्तानला आयएमएफच्या सूचना मानण्याचा सल्ला देत आहेत. त्यादरम्यान पाकिस्तान समोरील अडचणी वाढल्या आहेत. जर आयएमएफकडून निधी मिळाला तरीही तो पुरेसा होणार नसल्याची स्थिती आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्यावर्षी श्रीलंकेने स्वतःची आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली. आता पाकिस्तानमध्येही अशीच आर्थिक स्थिती आहे. श्रीलंकेच्या दिवाळखोरीमागे आधीच्या सरकारची धोरणे जबाबदार होती. मात्र, पाकिस्तानची धोरणेही जगापासून लपलेली नाहीत. या दोन्ही देशांतील राजकीय नेत्यांनी वेळीच कठोर पावले उचललेली नाहीत. त्यामुळे देशाची आर्थिक घडी बिघडली आहे. पाकिस्तानात सध्या महागाई उच्चांकावर आहे. आणि लोकांचे उत्पन्न घटले आहे. आयएमएफने जरी १ बिलियन डॉलरची मदत केली, तरी ही मदत किती दिवसांसाठी पुरेशी होईल, असा प्रश्न आहे.

पाकिस्तानमध्ये सध्या एक लिटर दुधासाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत. तर तांदूळ २१३ रुपये किलो आहेत. अंडी २१ रुपये नग आहेत. तर चिकन ५५० रुपये किलो आहे. संत्रे १६९ रुपये किलो असून बटाटे ६६ रुपये किलो आहेत. टोमॅटो १२६ रुपये किलो दराने विक्री केले जात आहेत. पाकिस्तानच्या रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत २७७.७१ पाकिस्तानी रुपया आहे. तर श्रीलंकेच्या रुपयाचे मूल्य ३२४.३४ रुपये प्रती डॉलर आहे. श्रीलंकन जनता महागाईने त्रस्त असून तेथील किरकोळ महागाईचा दर ५०.६ टक्के आहे. तर जानेवारीत महागाईचा दर ५१.७ टक्के होता. सध्या पाकिस्तानमध्ये ३१.५ टक्के महागाईचा दर आहे. ही गेल्या ५० वर्षातील उच्चांकी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here