पाकिस्तानचा खजिना रिकामा, महागाई ३८ टक्क्यांवर

आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानमध्ये राजकीय सुंदोपसुंदीची स्थिती आहे. तर सलग दुसऱ्या महिन्यात या देशातील महागाईचा दर आशियातील सर्वाधिक राहिला आहे. कंगालीच्या दिशेने निघालेल्या पाकिस्तानमध्ये एप्रिल महिन्यात महागाईचा दर ३६.४ टक्के होता. तर मे महिन्यात यात आणखी वाढ होऊन महागाई ३८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

आजतकमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, मोठ्या आर्थिक आव्हानांना तोंड देणारे पाकिस्तान सरकार राष्ट्रीय बजेट लवकरच सादर करणार आहे. यापूर्वी देशात महागाईचा दर उच्चांकी स्तरावर पोहोचल्याचे ब्लुमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटेस्टिक्सद्वारे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर महागाईचा दर ३७.९७ टक्के झाला आहे. देशात महागाई वाढण्यास खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत आहेत. तांदूळ, चहा, गहू या वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here