पारले जी ने तोडले लॉकडाउन मध्ये विक्रीचे रेकॉर्ड

नवी दिल्ली : 82 वर्षांपूर्वी जे बिस्किट बनवण्याची सुरुवात झाली होती, ते बिस्किट आजही लोकप्रिय आहे. कोरोना काळात लोकांनी पारले जी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. सामान्य लोकांनी या बिस्किटालाच अधिक पसंती दाखवली आहे. आजही हे बिस्किट भारातातील गावागावत पोचले आहे. लॉकडाउन दरम्यान, पारले जी ची विक्री इतकी झाली आहे की, गेल्या 82 वर्षातील सर्व विक्रम या विक्रीने तोडले आहेत.

पारलें प्रॉडक्टस चे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी सांगितले की, तीन महिन्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात कंपनीचे मार्केट शेअर एकूण 5 टक्के वाढले आहे. आणि यामध्ये 80-90 टक्के ग्रोथ पारले जी च्या विक्रीची आहे. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, लाखोंच्या संख्येने प्रवासी मजूर पायी चालून घरी जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना हे बिस्किट योग्य वाटले. एक तर हे बिस्किट स्वस्तही आहेत आणि हे खाल्ल्याने ग्लुकोजही मिळते. त्यामुळे अनेक लोकांनी पायी चालणार्‍या मजूरांच्या मदतीसाठी या बिस्किटाचे वाटप केले.

कंपनीने सांगितले की, पारले ने आपल्या 82 वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वात अधिक विक्रीचे नवा विक्रम नोंदवला आहे. कंपनीकडून किती लाभ झाला हे सांगण्यात आले नाही पण, हे सागितले की, कंपनीने गेल्या आठ दशकांचा विक्रम तोडला आहे. या लॉकडाउन मध्ये पारले जीला सार्‍या देंशात अधिक पसंत केले गेले.

पारले जी ची स्थापना सन 1938 मध्ये करण्यात आली होती. 1938 पासूनच हे बिस्किट लोकांचा एक आवडता ब्रॅन्ड राहिले आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बिस्किट स्वस्त आहे आणि उत्तम दर्जा. या बिस्किटाच्या विक्रीची अजूनही बरीच कारणे आहेत. कंपनीने सांगितले की, पारले प्रॉडक्टस ने आपल्या सर्वात चांगल्या विकल्या जाणार्‍या आणि किंमत कमी असणार्‍या पारले जी वर फोकस केले आहे.

ग्राहकांकडून याला मोठी मागणी होती. कंपनीने आपल्या डिस्ट्रिब्यूशन चैनललाही एका आठवड्यात रीसेट केले. जेणेकरुन रिटेल आउटलेट वर बिस्किटाची कमी येवू नये. यामुळे कंपनीने लॉकडाउन दरम्यान पुरवठ्यामध्ये कोणतीही कसूर केलेली नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here