पारलेची रोल-ए-कोला कैंडी पुन्हा बाजारात, 110 करोड विक्रीची आशा

नवी दिल्ली : अर्थिक मंदीमुळे कंपनीतील तब्बल 10,000 कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढण्याच्या गोष्टीवरुन पारले कंपनी अलीकडे चर्चेत होती. आता बाजारात पुन्हा एकदा जोरात गती मिळण्याच्या दृष्टीने पारले कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. 2006 मध्ये बंद झालेली रोल-ए-कोला कँडी पुन्हा एकदा बाजारात आली आहे. या कँडीला पारले ने लाँच केले आहे. बिस्किट आणि कन्फेशनरी बनवणार्‍या पारले कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना या कँडीमुळे आगामी वर्षात 100 करोड रुपये विक्रीची आशा आहे. यामुळे एकूण कारभारात या कैंडीचा 10 टक्के भागीदार राहण्याचा अंदाज आहे.

या कँडीची विक्री 2006 मध्ये बंद करण्यात आली होती आणि आता तब्बल 13 वर्षांनी या कॅँडीला पुन्हा बाजारात आणले आहे. पारले प्रॉडक्टसचे वरिष्ठ विपणन प्रमुख कृष्णा राव म्हणाले, सोशल मिडियावर या कैंडीची मागणी वाढली होती. ती पाहून आंम्ही या कैंडीला पुन्हा बाजारात उतरवले आहे. आगामी काळात जवळपास 200 टन रोल-ए-कोला ची विक्री होवू शकेल.  खरतर, पारले कंपनीने या कँडीची विक्री भारतात बंद केली होती, पण अफ्रिका आणि पश्‍चिम एशिया मध्ये त्याची विक्री सुरु होती. राव म्हणाले, चालु आर्थिक वर्षात या ब्रँडची तब्बल 50 ते 60 करोड रुपयापर्यंत विक्री होण्याची आशा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here