पतंजली ने लॉन्च केेले कोरोनावरील आयुर्वेदिक ‘कोरोनिल‘ औषध

नवी दिल्ली: जगभरात कोरोना वायरसने कहर माजवला आहे. दरम्यान योग गुरु बाबा रामदेंव यांनी कारोना वायरस साठी आयुर्वेदिक औषध बनवल्याचा दावा केला आहे. पतंजली योगगुरु रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी याची घोषणा केली. यावेळी उपस्थित असणार्‍या वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधक यांनी कोरोनाशी लढणार्‍या या औषधाला ‘कोरोनिल‘ हे नाव दिले आहे.

रामदेव बाबा म्हणाले, संपूर्ण शास्त्रीय कागदपत्रांसह श्‍वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनाची अ‍ॅडव्हान्स बेस्ड पहिले आयुर्वेदिक औषध आहे. पतंजली यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन संयुक्त रुपामध्ये पतंजली रिसर्च इन्सिस्टट्यूट हरिद्वार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर ऑफ मेडिकल सायन्स जयपूर कडून करण्यात आले आहे. औषधाचे निर्माते दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वार यांच्याकडून केले जात आहे.

योगगुरु बाबा रामदेव म्हणाले, आज आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, कोरोनासाठी पहिले आयुर्वेदिक, क्लीनिकली कंट्रोल्ड, ट्रायल, अ‍ॅडव्हान्स अणि संशोधनावर आधारीत औषध पतंजली रिसर्च सेंटर आणि एन आयएमएस यांच्या संयुक्त प्रयत्नाने तयार झाले आहे. या औषधाची आम्ही दोन ट्रायल घेतली आहेत. 100 लोकांवर क्लिनिकल स्टडी करण्यात आला. तीन दिवसांमध्ये 69 टक्के रुग्ण ठीक झाले. 7 दिवसांमध्ये 100 टक्के रुग्ण ठीक झाले.

आचार्य बाळकृष्ण म्हणाले, आज पतंजली परिवारासाठी खूप मोठा दिवस आहे. मानवतेच्या सेवेमध्ये नम्र प्रयत्न पूर्ण होण्याचा आनंद मोठा आहे. पतंजलीचे वैज्ञानिक, डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वच डॉक्टरांच्या सहकार्यामुळे हा प्रयत्न साकार होत आहे.

बाळकृष्ण म्हणाले, पतंजली हे सेवेचे दुसरे नाव आहे आणि ते शद्बांनी नाही तर कर्मांनी दिसून येते. रामदेव यांचे नेतृत्व आम्हाला उर्जा देते. आम्ही केवळ निमित्तमात्र आहे.

भारतात कारोनाग्रस्तांची एकूण संख्या 4 लाख 40 हजारापुढे गेली आहे. गेल्या 24 तासामध्ये कोरोना वायरस ची 14 हजार 933 नवी प्रकरणे समोर आली आहेत. आणि 312 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयांच्या नव्या आकड्यांनुसार, देशामध्ये आतापर्यंत 4 लाख 40 हजार 215 लोग कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी 14,011 यांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 48 हजार 190 लोक बरे झाले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

Image courtesy of PRINT-130

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here