‘व्हीएसआय’चा राजीनामा देण्यापासून पवारांनी थांबवले : मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : मी वसंतदादा साखर संस्थेच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार होतो, पण मला शरद पवार यांनी राजीनामा देण्यापासून रोखल्याचा गौप्यस्फोट राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. वसंतदादा साखर संस्थेत (VSI) एका कार्यक्रमासाठी शनिवारी (१२ ऑगस्ट २०२३ ) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री वळसे पाटील एकत्र आले होते. कळले या चर्चासत्रासाठी सर्व साखर पवारांची चर्चा करणार आहोत. असे पाटील म्हणाले.

मंत्री वळसे – पाटील म्हणाले कि, राजीमाना देण्याचा प्रश्न व्यक्तिगत आहे. पण मला शरद पवार यांनी राजीनामा देण्यापासून रोखले आणि काम करायला सांगितले आहे. ते पुढे म्हणाले कि, आम्ही पवारांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते होते आणि राहतील. पवार यांच्या सोबत मला कसलेही अवघडलेपण जाणवले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकार सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार करत असून महाराष्ट्रासाठी त्यामध्ये काय करता येईल, यावर विचार सुरु असल्याचेही मंत्री वळसे – पाटील यांनी सांगितले. या प्रश्नावर शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्र पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचे होते. त्यामध्ये कोणती राजकीय चर्चा झाली नाही, असेही मंत्री वळसे-पाटील म्हणाले. या चर्चासत्राला आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे हे ही उपस्थित होते.

Source : daily PUDHARI, AGROWON

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here