साखर कारखान्याकडून २४ दिवसांची ऊस बिले अदा

सहारनपूर : दी किसान सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसाचे पूर्ण बिल अदा केले आहे. यासोबतच २०२१-२२ मध्ये खरेदी केलेल्या २४ दिवसांची ऊस बिलेही देण्यात आली आहेत.

दी किसान सहकारी साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक व्ही. पी. पांडे आणि मुख्य लेखापाल सौरभ बन्सल यांनी सांगितले की, गेल्यावर्षी कारखान्याने शेतकऱ्यांकडून जो ऊस खरेदी केला होता, त्याचे जवळपास ३४ कोटी रुपये देय होते. हे सर्व पैसे कारखान्याने सर्वांना अदा केले आहेत.

ते म्हणाले, साखर कारखान्याने यंदा १ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू केला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या २४ नोव्हेंबरअखेर खरेदी केलेल्या ऊसापोटी १९ कोटी ९३ लाख रुपये दिले आहेत. ऊस समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पाठविण्यात आले आहेत. यावेळी उर्वरीत बिलेही लवकरात लवकर दिले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here