मुंडेरवा साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व बिले अदा

117

बस्ती : शासनाच्या अपेक्षेनुसार मुंडेरवा साखर कारखान्याच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्व ऊस बिले अदा केली आहेत. गळीत हंगाम २०१९-२० मधील ३६ लाख क्विंटल उसाची खरेदी कारखान्याने केली होती. शेतकऱ्यांना एकूण १०९.९५ कोटी रुपये ऊस बिल देणे गरजेचे होते. तीन मार्चपर्यंत गाळप केलेल्या उसापोटी १०४.१ कोटी रुपये यापूर्वीच देण्यात आले आहेत.

मुंडेरवा साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक विजयेंद्र द्विवेदी यांनी ही माहिती दिली. बनकटी विभागातील कबरा आणि धौरहरा गोचना येथील शेतकऱ्यांनी तयार केलेल्या नर्सरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, उर्वरीत ५ कोटी ८५ लाख रुपये शेतकऱ्यांना शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्व ते प्रयत्न सरकारच्यावतीने सुरू आहेत. शेतीसाठी अनुदानावर किटकनाशक, खतांसह इतर वस्तू दिल्या जात आहेत. सध्या शरद ऋतुतील ऊस लागणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी दहा लाख रोपे तयार केली जात आहेत. त्यातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसह खर्चही कमी होईल. सीसीएम कुलदीप द्विवेदी यांनी सांगितले की, शेतकरी नर्सरी तयार करण्यासाठी खते, इतर आवश्यक सामग्रीसाठी संपर्क साधू शकतात. यावेळी उप महाव्यवस्थापक ओ. पी. पांडे, एन. पी. वर्मा, के. एम. पांडे, उद्धव प्रसाद, उमेश सिंह, महेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here