मवाना साखर कारखान्याकडून १५.७२ कोटींची बिले अदा

95

मवाना: मवाना साखर कारखान्याने गळीत हंगामातील २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १५.७२ कोटी रुपये ऊस बिल अदा केले आहे. त्याची एडवाइजरी ऊस समित्यांना देण्यात आली आहे. साखर कारखान्याने शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारखान्याच्या ऊस विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून सुरू असलेल्या साखर विक्रीतून मिळणाऱ्या पैशांपैकी ८५ टक्के रक्कम ऊस बिलांपोटी दिली जात आहे. ऊसाचे सर्वेक्षणही गतीने सुरू आहे. सर्व शेतकऱ्यांनी ऊस विभागाच्या निर्देशानुसार ऑनलाइन घोषणापत्र भरावे आणि ऊस सर्व्हेत आपले योगदान द्यावे. शेतकऱ्यांनी कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा वापर करावा. आपले हात नियमीत धुवावेत तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप लिंक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here